फेसबुकची ईमेल सेवा बंद होणार

फेसबुकने कोणताही गाजावाजा न करता तीन वर्षापूर्वी सुरू केलेली फेसबुक ईमेल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Feb 25, 2014, 07:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फेसबुकने कोणताही गाजावाजा न करता तीन वर्षापूर्वी सुरू केलेली फेसबुक ईमेल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. युझर्सना @gmail.com प्रमाणे @facebook.com चे ईमेल अकाऊंट मिळत होते.
आता @facebook.com वर पाठवलेला संबंधित युझर्सचा मेल त्याला फेसबुक अकाऊंटच्या मेसेजमध्ये मेल म्हणून मिळणार आहे. आम्ही हा बदल यासाठी करतोय कारण, बरेचसे युझर्स याचा वापर करत नव्हते, असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे.
फेसबुकने ही ईमेल सेवा नोव्हेंबर २०१० मध्ये सुरू केली होती. फेसबुकने युझर्सचे पर्सनल ईमेल हटवून प्रोफाईलमध्ये @facebook.com चे ईमेल लावले होते. यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर फेसबुकने सर्वांचे ईमेल एड्रेस पूर्ववत केले होते.
ईमेल सेवा बंद करण्याचा निर्णय फेसबुकने १९ अब्ज डॉलरला वॉटस ऐपची खरेदी केल्यानंतर घेतला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.