www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
बँक ऑफ नोव्हा स्कोशीओज या हाँगकाँग बँकेच्या २०१२ साली चोरीला गेलेल्या चांदीच्या ५७ विटा नवी मुंबई पोलिसांनी शोधून कढल्यात. अहमदाबाद इथे कंटनेर पोहचल्यानंतर चोरी लक्षात आली होती. चोरीच्या विटा पोलिसांनी जप्त केल्यात.
ऑगस्ट २०१२ मध्ये हाँगकाँगमधून चांदीच्या ६०२ विटांचा कंटेनर अहमदाबादला पाठवण्यात आला होता. हा कंटेनर जेएनपीटी बंदरात उतरवण्यात आला. त्यानंतर बंदरातून रेल्वेने कंटेनर गुजरातमध्ये पाठवण्यात आला. त्यावेळी या कंटेनरचे सील बदलून काही विटा चोरण्यात आल्याचं लक्षात आलं. याप्रकरणी गुजरातमधील अडलाज पोलीस ठाण्यात गुन्हा नोदवण्यात आला होता.
तसेच या चोरीसंदर्भात २०१३ मध्ये जे. एन. पी . टी पोलीस ठाण्याला कळवण्यात आलं होतं.. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास करत सात आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या ५७ चांदीच्या विटाही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या विटांची किमत तीन कोटी ३२ लाख एवढी असल्याचं सांगण्यात येतंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.