www.24taas.com,झी मीडिया,ठाणे
गड सर करण्यासाठी आता शिडीची मदत होणार आहे. हा प्रयोग मलंग गडावर होणार आहे. ११७४ मीटर उंचीची शिडी उभारण्यात येत आहे. त्यामुळे गडावर चढण्यासाठी ही शिडी कामी येणार आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंग गडावरील देशातील पहिल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम वेगाने सुरु असून, येत्या डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात भाविक आणि पर्यटक या ट्रॉलीतून अवघ्या पाच ते सहा मिनिटात मलंग गडावर चढू आणि उतरू शकणार आहेत.
देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून त्यामुळे मलंग गडावर येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या सोयीसाठी या रूळ मार्गाला समांतर अशी ११७४ मीटरची शिडीही उभारण्यात येत आहे. देशातील ती सर्वात मोठी शिडी ठरणार आहे.