www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ठाणे महानगरपालिकेबाहेर मनसेनं आज आंदोलन सुरु केलंय. ‘विक्रांत’ला पैसे देऊ नका ठाण्यातील मुलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या, अशी भूमिका मनसेनं घेतलीये.
तसंच काल परिवहन समिती निवडणुकीत अर्ज भरताना झालेल्या मारहाणीचाही कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर मनसे स्टाईलनं उत्तर देणार, असा इशारा कार्यकर्त्यांनी केलाय.
गुरुवारी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. परिवहन निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती.
आघाडीनं फोडलेल्या शिवसेनेच्या सदस्यांचा अर्ज भरताना हा प्रकार घडला. शिवसेनेचे शैलेश भगत आघाडीच्यावतीनं अर्ज भरत होते. त्यावेळी त्यांना रोखण्यात आलं. अखेर पोलिसांना बोलावण्यात आलं. तर दुसरीकडे कल्याणमध्ये सेनेच्या नेत्यांमध्ये अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ झाली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.