ठाणे : मुंबई उच्च न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेचं पालन करण्याकरता, ठाण्यातल्या राहत्या भागात चार तरुणांनी रविवारी झाडू मारली.
दस-याला देवी विसर्जन मिरवणुकीत या तिघांनी, महिलेचा विनयभंग केला होता. शिवाय मध्यस्थी करणा-याला मारहाणही केली होती. अशा प्रकरणांत बहुतांश वेळा आरोपी बाहेर तडजोड करुन सहीसलामत सुटतात.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी, न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यानुसार सहा महिने दर रविवारी आठ तास आपल्याच भागात झाडू मारण्याची शिक्षा न्यायालयानं या चौघांना सुनावली आहे.