www.24taas.com , झी मीडिया, नाशिक
राज्यात सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात अष्टमी आणि नवमीच्या स्वागतासाठी फुलांची उधळण सुरु आहे. शेतात ठिकठिकाणी पिवळ्या आणि नारिंगी रंगाच्या झेंडूनी शेती बहरली आहे. जणू काही नवरात्रीनिमित्त भूमातेनेही फुलांचा साज परिधान केला आहे.
कांद्याचे चढते भाव आणि झेंडूलाही चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना या निमित्ताने दोन पैसे मिळू लागले आहे. त्यामुळे नाशिकच्या बळीराजाची दिवाळी आनंदात जाणार असं चित्र आहे.
ठाण्यात शिवाई नगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या नवरात्रीत देवी भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे. दांडिया-गरबा खेळण्यासाठी दांडीया प्रेमी एकच गर्दी करतात. मंडळाच यंदाच २७ व वर्ष असून केदारनाथ मंदिराचा देखावा सादर करण्यात आलाय.
या देवीचे दर्शन घेण्यासाठी मराठी कलाकार आवर्जुन येतात. हिट सिनेमा दुनियादारीच्या टीमने या देवीचे दर्शन घेतले. त्याच बरोबर `वंशवेल` या आगामी चित्रपटाच्या टीमनेही दर्शन घेतले. दुनियादारी सारखे यश बाकीच्या चित्रपटांना मिळू दे त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी नावारूपाला येईल, अशी प्रतिक्रीया कलावंतांनी दिली. कलाकारांनी लोकांमध्ये जाऊन गरबा खेळून मनं जिंकली.
दरम्यान, या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे आपली संकृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात येतो. महिलांचा भोंडला या कार्याकामाचे आयोजन करण्यात आला. परिसरातील महिलांनी कार्य्कामाला आवर्जून हजेरी लावली. महिलांन पारंपारिक गाणी आणि ओव्या गाऊन आनंद लुटला.
दस-याला गिरगाव चौपाटीवर रावण दहन केलं जातं. त्याची जय्यत तयारी सध्या गिरगाव चौपाटीवर सुरु आहे. यंदा 50 वं वर्ष असल्याने रावणाच्या प्रतिकृती अधित आकर्षक बनवण्यात आल्या आहेत. 55-60 फुट उंचाही ही प्रतिकृती असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ