www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
राज्यभरात कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. मुंबईत ७० ते ८० रुपये किलोनं कांदा मिळतोय. तर नाशिकमधल्या बाजारात कांदा ७० ते ८० रुपये आहे. पुण्यातही ७० ते ८० याच भावानं एक किलो कांदा विकला जात आहे. दुसरीकडे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र पुढील दोन तीन आठवड्यांत कांद्याचे दर उतरण्याची शक्यता व्यक्त केलीय.
महाराष्ट्रातून, देशातील इतर राज्यांतून कांद्याची आवक वाढल्याने येत्या दोन-तीन आठवडय़ात कांद्याच्या किंमती कमी होतील, असे संकेत गुरूवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी वृत्तसंस्थेशी दिले होते. मात्र, राज्यात कांद्याची किंमत वाढलेली दिसून येत आहे.
नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चीन, इजिप्त आणि पाकिस्तानमधून कांदा आयात करण्यात आला आहे. मात्र घाऊक बाजारात या कांद्याचे भाव ४० रुपये प्रतिकिलो असल्याने कांद्याच्या भावावर फारसा परिणाम झालेला नाही. पाकिस्तानमधून दोन कंटेनर कांदा आयात करण्यात आलाय. मात्र या कांद्याचा दर्जा चांगला नसल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ