नवी मुंबई : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे सर्वच शेती मालावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. यात कांदा पीक देखील धोक्यात आले आहे.
आधीच अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे कांद्याचे पीक कमी आहे, त्यात पाऊसच न पडल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये येणारा कांद्याचे पीक देखील कमी येईल आणि कांदा महाग होण्याची चिन्हे आहेत.
गेले चार पाच वर्ष कांदा वांदा करत आहे, निसर्ग चक्र बदलत असल्याने हा परिणाम दिसत आहे. यावर्षी मार्च आणि मे महिन्यात येणारे कांद्याच्या पिकावर अवकाळी पाउस आणि गारपीटीमुळे मोठे नुकसान केले, यामुळे यावर्षी साठवणूकीचा कांदा कमी आहे.
त्यातच जून महिन्यात पेरणी केल्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत नवीन पीक येते. परंतु आता जूनमध्ये पाउस न पडल्याने कांद्याची पीक देखील लांबणीवर पडले आहे .
सध्या मार्केटमध्ये कांदा येत असला तरी तो जास्त कमी प्रतीचा येत आहे, आणि चागल्या प्रतीचा माल हा २० ते २२ रुपये किलो घाउक मार्केट मध्ये विकला जात आहे, त्यात कांद्याचे पीक अजून उशीराने आले तर कांदा वांदा करणार हे नक्की.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.