रत्नागिरी अपघातात सहा ठार, दोघे मुंबईचे

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नजीक असुर्डे गावाजवळ नीता ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झालाय. अपघातामध्ये ६ जण ठार झालेत तर १५ जण जखमी झालेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 20, 2012, 11:35 AM IST

www.24taas.com,रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नजीक असुर्डे गावाजवळ नीता ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झालाय. अपघातामध्ये ६ जण ठार झालेत तर १५ जण जखमी झालेत.
मृतांमध्ये एका काश्मीरी नागरिकाचा तर दोन मुंबईच्या प्रवाशांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती गंभीर असून यापैकी १० जणांवर डेरवणच्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघातात बसचालकही गंभीर जखमी झालाय.
अपघातग्रस्त बस मुंबईकडून गोव्याकडे निघाली होती. पहाटेच्या सुमारास असणारे दाट धुकं आणि अवघड वळण यामुळे चालकाचा ताबा सुटून ही बस रस्त्याच्या कडेला उलटल्यानं हा अपघात घडला..या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
अपघातातल्या काही मृत प्रवाशांची ओळख पटलेली आहे. यात केशवलाल वेलजी रोलू (६२,वेंगुर्ला), फारूख मोहम्मद दर (३२, जम्मू काश्मीर), शशीधर करकेरा (४६, मालाड), आदिती करकेरा (१३, मालाड) यांचा समावेश आहे.