राज्याला रत्नागिरी वीज प्रकल्प डोईजड

पूर्वीचा बुडीत निघालेला दाभोळ प्रकल्प नव्या नावाने सुरू करण्यात आला. आता हाच रत्नागिरी गॅस वीज निर्मितीचा प्रकल्प हा केंद्र सरकारकडे हस्तांतरीत करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 12, 2013, 05:46 PM IST

www.24taas.com, रत्नागिरी
पूर्वीचा बुडीत निघालेला दाभोळ प्रकल्प नव्या नावाने सुरू करण्यात आला. आता हाच रत्नागिरी गॅस वीज निर्मितीचा प्रकल्प हा केंद्र सरकारकडे हस्तांतरीत करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
पुरेसा गॅस उपलब्ध होत नसल्याने 2200 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेच्या या प्रकल्पातून सध्या वीज निर्मिती ही बंद आहे. गॅस उपलब्ध न होण्याचा प्रकार वारंवार होत आहे. तसंच तयार होणारी वीज ही काहीशी महागडी आहे.

महागडी विजेच्या कारणांमुळे महावितरण कंपनीने 22 जानेवारी 2013 ला रत्नागीरी गॅस वीज निर्मिती प्रकल्प केंद्राकडे हस्तांतरीत करावा असा प्रस्ताव पाठवला राज्य सरकारला पाठवला आहे.
या बदल्यात पर्यायी वीज उपलब्ध करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तेव्हा या प्रस्तावावर विचार सुरु असल्याचं सरकारने तारांकीत प्रश्नोत्तरामध्ये नमूद केलं आहे.