मनमानीला कंटाळून प्रवाशांचा रिक्षांवर बहिष्कार

डोंबिवलीत रिक्षाचालाकांच्या मनमानीला कंटाळून संतप्त प्रवाशांनी रिक्षांवर बहिष्कार टाकलाय. मात्र दुसरीकडे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी अजूनही मुग गिळून गप्प आहेत. त्यामुळे नागरिकांनी नेत्यांच्याविरोधात रोष व्यक्त केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 14, 2012, 09:22 PM IST

www.24taas.com,डोंबिवली
डोंबिवलीत रिक्षाचालाकांच्या मनमानीला कंटाळून संतप्त प्रवाशांनी रिक्षांवर बहिष्कार टाकलाय. मात्र दुसरीकडे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी अजूनही मुग गिळून गप्प आहेत. त्यामुळे नागरिकांनी नेत्यांच्याविरोधात रोष व्यक्त केलाय.

डोंबिवलीमध्ये सध्या प्रवासी रांगेत उभे राहून केडीएमटीच्या बस सेवेला पसंती देताहेत. कारण रिक्षा चालकांनी मनमानी पद्धतीने भाडं वाढवल्यानं प्रवाशांचं बजेटच कोलमडायला लागलं. त्यामुळे नागरिकांनी रिक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.
एरव्ही नागरी प्रश्नांवर कळवळा दाखवणारे राजकीय नेते या संपूर्ण प्रकरणात कुठेही पुढं आलेले नाहीत. नागरिकांची लूट थांबावी, अशी त्यांची इच्छा आहे की नाही ? असाच प्रश्न आता निर्माण झालाय.

काही राजकीय नेते रिक्षा संघटनांचे पदाधिकारी देखील आहेत. मात्र दुसरीकडे प्रवासीही त्यांचे मतदार आहेत, याचा जणू त्यांना विसर पडलाय. त्यामुळे नेते जनतेसाठी आहेत की, स्वत:च्या स्वार्थासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय.