www.24taas.com,ठाणे
ठाण्यात पातळी पाडा उड्डाण पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात चांगलंचं निषेध नाट्य रंगलं. शिवसेनेच्या आमदारांनी विकास कामांमध्ये सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप करत गोंधळ घातला.
ठाण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसनेच्या नेत्यांनी एमएमआरडीएवर चांगलचं तोंडसुख घेतलंय. ठाण्याला निधी देण्याबाबबत एमएमआरडीए दुजाभाव करत असल्याचा आरोप करत वेळ पडल्यास कोर्टात जाण्याचा इशारा पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलाय. अन्याय असाच सुरू राहिल्यास ठाण्यासाठी वेगळं विकास प्राधिकरण स्थापन्याची माणीही त्यांनी केलीय.
ठाण्यात घोडबंदर रोडवरच्या पातळी पाडा उड्डाण पुलाचं काल उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला शिवेसनेचे आमदारही उपस्थित होते. मात्र कापुरबावडी आणि मानपाडा या उड्डाण पुलाचं काम धीम्या गतीनं सुरू आहे. या दोन्ही पुलांकडं सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या आमदारांनी स्टेजवर न जाता खाली बसून त्याचा निषेध केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि वसंत डावखरे यांनी विनंती केल्यानंतर शिवसेनेचे आमदार स्टेजवर गेले. शेवटी मंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर कार्यक्रम शांततेत पार पडला.
इतर दोन्ही पुलांची कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन क्षीरसागर आणि पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी दिलं. ठाणेकरांची घोडबंदर रोड वरील वाहतूक कोडींची समस्या सोडवायची असेल तर कापुरबावडी आणि मानपाडा या दोन्ही पुलांचं काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे.