www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
उन्हाळी सुट्टया लागल्या की, चाकरमानी आणि पर्यटक यांची गर्दी कोकणाकडे वळते. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा विचार करता मध्य रेल्वेने दादर ते सावंतवाडी अशा एकूण ५२ विशेष गाड्या सोडणार येत असल्याचे सांगितलंय. तसेच या विशेष गाड्या आठवड्यात तीन वेळेस धावतील.
दादर-सावंतवाडी ही विशेष गाडी ११ एप्रिल ते ८ जूनपर्यंत सुरु होणार असून, आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार, रविवार यादिवशी धावेल. ही गाडी सकाळी दादरवरुन ७.५० मिनिटाने सुटेल. ती सावंतवाडीला सायंकाळी ७.२० मिनिटाने पोहोचेल.
सावंतवाडी-दादर ही विशेष गाडी १२ एप्रिल ते ९ जूनपर्यंत सुरु होणार असून, आठवड्यातील बुधवार, शनिवार, सोमवार यादिवशी धावेल. ही गाडी सकाळी ५.०० वाजता सावंतवाडीवरुन सुटेल. ती दुपारी दादरला ४.१० मिनिटाने पोहोचेल.
या विशेष गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, माणगाव, सावरडा, आडवली, विलवडे, वैभववाडी, सिंधुदुर्ग या ठिकाणी थांबणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.