www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यातील नगरसेविकेचं पद रद्द करण्यात आलंय. सुप्रीम कोर्टानं नगरसेविकेला दणका दिलाय. मात्र, यामुळे ठाण्यातील महायुतीलाच धक्का बसलाय.
ठाण्याचा वॉर्ड क्रमांक - ५१ च्या चांदणी दुराणी या नगरसेविकेचं जातप्रमाणपत्र अवैध असल्याचं सिद्ध झाल्यानं सुप्रीम कोर्टानं त्यांचं पदच रद्द करून टाकलंय. चांदणी दुराणी या दौलतनगर आणि प्रेमनगरच्या नगरसेविका आहेत.
एका नगरसेविकेचं पद रद्द झाल्याने ठाण्यात सत्ताधारी महायुतीला दणका बसलाय. या निर्णयामुळं महायुती आणि आघाडीच्या नगरसेवकांची संख्या समसमान म्हणजेच ६५ इतकी झालीय.
दरम्यान, नगरसेविकेचं पद वाचवण्यात अपयश आलं असलं तरी आगामी काळात विकास कामांमुळं ठाणेकर महायुतीला मतदान करतील, असा विश्वास भाजप नेते संदीप लेले यांनी व्यक्त केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.