आशियातल्या सगळ्यात मोठ्या जिल्ह्याचं विभाजन?

आशिया खंडातला सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन लवकरच होण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 24, 2012, 06:44 PM IST

www.24taas.com, ठाणे
आशिया खंडातला सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन लवकरच होण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
नव्या जिल्ह्याचं मुख्यालय पालघर इथं असावं, असा अहवाल कोकण विभागीय आयुक्तांनी दिल्याची माहिती होती. पालघर जिल्ह्यात पालघर, वसई, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा आणि तलासरी हे तालुके असतील. नव्या जिल्ह्याचं मुख्यालय पालघर असावं की जव्हार यावरून वाद आहे. जव्हारमध्ये अपर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. त्यामुळे मुख्यालय पालघरला नेण्यास जव्हार तसंच मोखाडा, विक्रमगड या तालुक्यांचा विरोध आहे....
दरम्यान, विभाजनामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असं मत तज्ज्ञांनी मांडलंय. विभाजन झालेल्या दोन जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालक्यांचा समावेश असेल, याची तपशीलवार माहिती मात्र अजून देण्यात आलेली नाही.