ठाणे पालिका राडा, सेना-भाजपच्या ५ जणांना अटक

ठाण्यामधल्या उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्या केबिनच्या तोडफोडप्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नौपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 26, 2013, 12:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यामधल्या उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्या केबिनच्या तोडफोडप्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नौपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ठाणे परिवहन समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अजय जोशी यांनी आघाडीला साथ दिली होती. अजय जोशी यांनी आघाडीला साथ देण्यासाठी पाटणकरांची फूस होती, असा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांच्या केबिनची तोडफोड झाली होती.
ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला परिवहन समितीच्या निवडणुकीत युतीच्या पराभवाला कारण ठरलेले उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना धडा शिकविण्यासाठी काही नगरसवेकांनी हिसका दाखविला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे पालिकेत राजकीय राडा पाहायला मिळाला होता. मात्र, आपल्याला मारहाण झालीच नसल्याचा दावा पाटणकर यांनी स्पष्ट केले. पालिकेतील राड्यानंतर पाटणकर महाराष्ट्राच्या बाहेर होते. तेथूनच त्यांनी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान उपमहापौर मिलिंद पाटणकरांच्या केबिनच्या तोडफोड प्रकरणी मनपानं अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नौपाडा पोलिसांनी आज पाच जणांना अटक केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.