थर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी

थर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी होवू लागलीय. कोकणातले समुद्रकिनारे सध्या गजबजलेत. पर्यटकांमुळे हॉटेलचे दरही दुप्पटीने वाढलेत. यंदा पर्यटकांची सर्वाधिक पसंती तारकर्ली बीचला. तसेच रत्नागिरीलाही पसंती आहे. गणपतीपुळे येथेही अशी परिस्थिती आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 26, 2013, 11:17 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, सावंतवाडी
थर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी होवू लागलीय. कोकणातले समुद्रकिनारे सध्या गजबजलेत. पर्यटकांमुळे हॉटेलचे दरही दुप्पटीने वाढलेत. यंदा पर्यटकांची सर्वाधिक पसंती सिंधुदुर्गीतील तारकर्ली बीचला. तसेच रत्नागिरीलाही पसंती आहे. गणपतीपुळे येथेही अशी परिस्थिती आहे.
तारकर्लीतील हॉटेलही महिनाभरापूर्वीच फ़ुल्ल झालीयत. पर्यटकांची वर्दळ लक्षात घेता किनारपट्टीवरचा बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यतील तारकर्ली, देवबाग, मालवण आणि सेर्जेकोट या भागातील सर्व लॉज सध्या हाऊसफुल झालेत. वेंगुर्ल्याचा भोगवे बीच, उभा दांडा, नवाबाग, सागरेश्वर हा परिसरही सध्या गजबजलाय. या वर्षीचे मासे आणि लॉजिंगचे दर दुप्पटीने वाढलेत.
यंदा सूरमईचे दर दीडशे ते ४०० रुपये तर पापलेटचे दर २०० ते ४०० रुपयांवर पोहचलेत.. ५०० ते ४००० पर्यंत असणारे लॉजिंगचे दर यंदा २००० ते ८००० पर्यंत पोहचलेत. असं असूनही पर्यटकांनी सिंधुदुर्गलाच पसंती दिलीय. सिंधुदुर्गात यावर्षी पर्यटकांची संख्या वाढल्यानं इथल्या यंत्रणांवरचा ताण वाढलाय. जेवणाबरोबरच लोजीगचे दरही वाढलेत मात्र तरीही येवा कोकण आपलाच हासा म्हणत इथले पर्यटन व्यावसायिक मात्र सोय झाली नाही म्हणून पर्यटक माघारी जाणार नाही याची काळजी घेत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.