आसाराम बापूंचा साधक बेपत्ता!

अमित चितळे गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. अमित हा आसाराम बापूंचा साधक म्हणून काम करत होता. २९ मे २०१३ रोजी अमितचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलंय. मात्र त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्यामुळं अमितच्या गायब होण्यामुळं गूढ निर्माण झालंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 8, 2013, 01:29 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, ठाणे
अमित चितळे गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. अमित हा आसाराम बापूंचा साधक म्हणून काम करत होता. २९ मे २०१३ रोजी अमितचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलंय. मात्र त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्यामुळं अमितच्या गायब होण्यामुळं गूढ निर्माण झालंय.
ठाण्यात राहणारं चितळे कुटुंब सध्या दु:खात बुलाडलंय. तीन महिन्यांपासून त्यांचा मुलगा बेपत्ता आहे. रेखा चितळे पती, एक मुलगा आणि मुलगी असा चौघांचा सुखी संसार होता. २००४ मध्ये या कुटुंबानं आसाराम बापूंच्या आश्रमात दीक्षा घेतली आणि त्यांचे ते भक्त झाले. ३० जून २०१२ मध्ये बापूंची सेवा करायला जातो असं सांगून अमित घराबाहेर पडला. तेव्हापासून बापूंच्या आश्रमात काम करणाऱ्या अमितचा काही पत्ता नाही.
अमितनं २९ मे २०१३ रोजी घरी एसएमएस पाठवला. त्यात तो मौर्नअनुष्ठान करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर अमितचा थांगपत्ताच नाही. आश्रमातल्या मंडळींनीही याबाबत त्यांना कळवलं असता चितळे कुटुंबिय हरिद्वारला गेलं. मात्र तिथं गेल्यावर त्यांच्या पायाखालून जमीनच सरकली. गंगा नदीत आंघोळ करताना पाय घसरुन अमित बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी सांगितली. याबाबत पोलिसांत तक्रारही करण्यात आली. अमितचा मृतदेहाचा साऱ्यांनी शोधला. मात्र अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही. अजूनही अमित परतेल अशी आस त्याच्या आईला आहे.

अमितबद्दल काही माहिती मिळाल्यास ती त्वरित कळवा असं कळकळीचं आवाहन या मातेनं साऱ्यांना केलंय. त्यासाठी ९९३०७६०९५०, ९८२०८७३३२०,९८२०८८३९३७ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
आपल्या लाडक्या लेकासाठी या मातेचा जीव झुरतोय. चितळे कुटुंबियांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळलाय. मात्र आसवांनी पाणावलेल्या या डोळ्यांत आजही एक आस आहे की माझा अमित परतेल..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.