www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
मुंबईत सध्या विरळाच दिसणाऱ्या डबल डेकर बस आता ठाण्याच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहे.
अशा दहा डबलडेकर बसेस विकत घेण्याचा प्रस्ताव परिवहन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. परंतु, ठाण्यात परिवहन समस्या अत्यंत गंभीर आहे. गेली अनेक वर्षं ठाणे परिवहन तोट्यात आहे. टीएमटीच्या ३०० बसेसपैकी जवळपास ८० बसेस बिघडलेल्या अवस्थेत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर असताना १० नव्या डबल डेकर बसचा घाट कशासाठी? असा ठाणेकरांचा सवाल आहेत.
‘नव्या बसेस घेण्यापेक्षा आहेत त्या बसेस दुरुस्त करा आणि त्यांची सेवा सुधारण्यावर भर द्या’ असं ठाणेकरांचं म्हणणं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.