www.24taas.com
निसर्ग आणि मानवाचा अन्यय साधारण संबंध आहे. म्हणूनच निसर्गाचा हिरवा रंग आपल्याला आकर्षून घेतो. हिरवे काहीही पाहिले की मन प्रसन्न होते. निसर्गातील हिर्वी गर्दी मनाला तजेला देते. उत्साह देते. हा उत्साह रोज मिळावा म्हणूनच आपण घरोघरी रोपे लावती. फेंगशुईत रोपांना महत्त्व आहे.
रोपे घरात किंवा कार्यालयात लावतो तेव्हा `यांग` नावाची ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे घरात छान, प्रसन्न वातावरण निर्माण होते. त्यामुळे ताजी, टवटवीत फुले घरात ठेवावीत. दिवाणखान्यातील फुलदाणीत अशी फुले असावीत. पण ही फुले सुकल्यावर किंवा मरगळल्यावर मात्र तेथून काढून टाकावीत. त्यांच्या जागी ताजी, टवटवीत फुले ठेवली पाहिजेत.
फुलांची रोपे शयनगृहात न ठेवता, ती दिवाणखान्यात ठेवावीत. किचनमध्ये ठेवली तरी चालेल. आजारी व्यक्तीच्या शयनगृहात फुलांची रोपटी ठेवणे हे त्याला रोगातून बरे करण्यासाठी उपयुक्त ठरते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.