कोकण रेल्वेला पावसाचा तडाखा, रूळावर माती

विलवडे रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली होती. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा तडाखा विलवडे स्थानकाला बसला. पावसामुळे रूळावर माती आणि दगड आल्याने वाहतूक बंद पडली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 25, 2013, 02:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
विलवडे रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली होती. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा तडाखा विलवडे स्थानकाला बसला. पावसामुळे रूळावर माती आणि दगड आल्याने वाहतूक बंद पडली.
विलवडे गावाजवळील रेल्वे रुळांवर माती आल्याने कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाली होती. कोकण रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेवून माती आणि दगड बाजुला केलेत. त्यानंत दीड ते पावने दोन तासांनी वाहतूक सुरळीत झाली. याबाबत कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्यात, रूळावर छोटासा दगड आला होता. तो बाजुला करण्यात आला. आता रेल्वे सुरळीत सुरू आहे.

सतत पडणाऱ्या पावसाचाही परिणाम मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावर दिसून आला.जनशताब्दी एक्स्प्रेसही रत्नागिरी स्थानकात थांबवण्यात आली होती. तर मडगाव-दिवा ही गाडी आडवली स्थानकात थांबविण्यात आली होती. पावसामुळे रेल्वेचा वेग मंदावला आहे. त्यातच पासाचा तडाखा बसल्याने रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना थोडासा त्रास सहन करावा लागत आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.