www.24taas.com,मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक खडकावर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. त्यामुळे समुद्रात स्मारक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अरबी समुद्रातल्या शिव स्मारकाची स्थिती जैसे थे असल्याची माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी विधान परिषदेत दिलीय. मात्र यासाठी २० ते २५ विविध गोष्टींचा सखोल अभ्यास करुन विविध विभागांची परवानगी घ्यावी लागणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
लवकरच केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांसमोर या प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात येणार असून २ एप्रिलला पर्यावरण मंत्री मुंबईत येतायत. हे स्मारक १६.५ हेक्टर खडकावर उभारण्यात येणार आहे. त्याकरिता १२ हेक्टर उथळ भागाचाही वापर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
या स्मारकासाठी मुंबई शहराचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने मरीन ड्राइव्ह-गिरगावच्या समुद्रातली जागा निश्चित केलीय..