www.24taas.com, वॉशिंग्टन
वजन कमी करण्याचा एक सोपा उपाय डॉक्टरांनी शोधून काढला आहे. आणि हा उपाय तुमच्या फ्रिजमध्ये आहे. होय. फ्रिजमध्ये ठेवलेलं थंडगार फ्रोझन आहार खाल्ल्यास जाडेपणा कमी होतो, असं डॉक्टरांनी एका संशोधनातून सिद्ध केलं आहे.
संशोधन करणाऱ्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे, की फ्रोजन अन्न खाल्ल्यामुळे कंबर नियंत्रणात राहाते. कारण फ्रिजमधील अन्न कॅलरीज कमी करत असतं. लोयोला युनिव्हर्सिटी हेल्थ सिस्टमच्या पोषणाहार आणि वजन नियंत्रण प्रबंधन संबंधित विशेषज्ञ असणाऱ्या जेसिका बार्टफिल्ड यांनी सांगितलं, “कमी कॅलरी असलेल्या आहारातून नियंत्रित प्रमाणात कॅलरीज घेतल्या जातात. यामुळे वजनावर नियंत्रम ठेवणं शक्य होतं.”
या शिवाय बार्टफिल्ड असंही म्हणाल्या की अधिकांश लोक कमी कॅलरी असलेला आहार करतात. या आहारातून दिवसाला १००० ते १८०० कॅलरीज मिळतात. या गोष्टी वजन, वय, उंची आणि लिंग यांवर अवलंबून असतात. त्यामुळे आता वजन कमी करायचं असेल, तर फ्रिजमध्ये काय ठेवलंय, ते पाहा.