महिलांनो सौंदर्यासाठी ह्या गोष्टी आहेत आवश्यक

सौंदर्य म्हणजे प्रत्येक स्त्रीचा एक वेगळी अशी ओळख असते. त्यामुळे स्त्री आपल्या सौंदर्याबाबत जागरूक असते. किंबहुना तिने तसे असावेच.

Updated: Mar 20, 2013, 08:12 AM IST

www.24taas.com, मुंबई
सौंदर्य म्हणजे प्रत्येक स्त्रीचा एक वेगळी अशी ओळख असते. त्यामुळे स्त्री आपल्या सौंदर्याबाबत जागरूक असते. किंबहुना तिने तसे असावेच. प्रत्येकीस केवळ चेहऱ्याचे सौंदर्य वाढवून अथवा त्याच्याबाबत विचार करून चालत नसते किंवा महाग आणि अद्ययावत सौंदर्य-प्रसाधनांचा वापरही तिने केला, की ती सुंदर दिसू लागते, असे नव्हे. त्यासाठी तिचा देहही आंतरिक आणि बाह्य पातळीवर सुंदर हवा.
देहाची सुंदरता व स्त्रीचे सु-आरोग्य या दोन्ही बाबी परस्पर-निगडीत व परस्पर पूरक असतात. सुंदर देहात तेवढाच सुंदर आत्मा वा मन वास करत असणे आवश्यक ठरते, अन्यथा स्त्री-सौंदर्यास उठाव येत नसतो. स्त्रीच्या सौंदर्याचे वर्धन करण्यासाठी तिने आपल्या दैनंदिन जीवनात संतुलीत आहार व नियमित व्यायाम ही द्वीसूत्री विसरू नये.
मानवी जीवन सुखी, समाधानी असेल, तर आपोआपच त्याची आभा तिच्या चेहर्‍यावर पडते. स्त्रीचा निंयत्रीत व पौष्टीक आहार आणि व्यायाम यांची जोडही यास हवी. निसर्गाने आपल्याला केवळ उर्जा, वातावरण, पाऊस, हवा, इ. दिले आहे, असे नाही, तर त्यात उपलब्ध असणारी वनस्पती, फळे भाजीपाला केवळ सु-आरोग्य बनविण्यास नव्हे, तर आपल्याला प्राकृतिक सौंदर्य-प्रसाधने देण्यासही जबाबदार असतात. म्हणूनच आपण आरोग्य, आहार, व्यायाम, व सौंदर्य या महत्वपूर्ण बाबींची सांगड यशस्वीपणे घालून जीवनात समाधान, स्थैर्य आणण्याचे प्रयत्‍न करणे. ही त्याबाबत उपयुक्त माहिती व या सर्वांचा विचारच आहे.