बदलत्या हवामानात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

सध्या नवी दिल्लीत डॉक्टर त्वचेसंबंधीत असलेले त्रास आणि त्याची स्वच्छता कशी ठेवता येईल यावर लक्ष देत आहेत. बदलत्या हवामानानुसार वेगवेगळे आजार आणि रोग पसरले जातात. म्हणून या बदलत्या हवामानात डोळ्यांची काळजी घेणं सर्वांत महत्त्वाचं आहे.

health.india.com | Updated: Jun 24, 2014, 12:06 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सध्या नवी दिल्लीत डॉक्टर त्वचेसंबंधीत असलेले त्रास आणि त्याची स्वच्छता कशी ठेवता येईल यावर लक्ष देत आहेत. बदलत्या हवामानानुसार वेगवेगळे आजार आणि रोग पसरले जातात. म्हणून या बदलत्या हवामानात डोळ्यांची काळजी घेणं सर्वांत महत्त्वाचं आहे. डोळे आपल्या शरीरातील खूप नाजूक भाग आहे त्यामुळं डोळ्याची काळजी घ्यावी आणि त्यावर जास्त लक्षही द्यावे. डॉक्टरांच्या मते, बदलत्या हवामानानुसार लोक डोळ्यांच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवतात. त्यामुळे काहीवेळा मोठी समस्या उद्भवते.

या वातावरणात डोळ्याला वायरल इन्फेकेशन होवू शकते. मात्र जर आपण छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं तर काही त्रास उद्भवणार नाही. विषाणू (बॅक्टेरिया) वायरस, एलर्जी, घाम आणि पावसातील पाणी आपल्या डोळ्याच्या त्रासाला आमंत्रण देऊ शकतात. असे काही झाल्यास लगेच डॉक्टरांचे उपचार घ्यावेत धुळीपासून डोळ्यांना दूर ठेवावे तसेच कोणी वापरलेला टॉवेल अथवा रुमाल वापरु नये. हात नेहमी साफ ठेवावे. आपल्या कॉनटॅक्ट लेन्सना वेळेवर साफ करुन त्याचा उपयोग करावा, उन्हात जाण्यापूर्वी चश्मा लावावा.

चश्मा फक्त उन्हापासून नव्हे तर धूळ आणि घाणीपासूनही डोळ्यांना संरक्षण देतात. पाळीव प्राण्यांपासून लांब राहावे तसेच त्यांना जास्त हातही लावू नये आणि त्याच्या अंथरुणावर ही झोपू नये. डोळ्यासाठी असलेले मेकअपचे सामान कोणासोबतही शेअर करु नये. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात डोळ्यांची जास्त काळजी घ्यावी.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. * झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.