www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या बाजारात अशा अनेक सौंदर्य क्रीम आहेत की ज्या लवकरात लवकर गोरं बनविण्याचा दावा करतात. मात्र अशा क्रीममुळं आपल्याला त्वचेचे गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळं महिलांनो सावध राहा...
गोरं बनविणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांची तपासणी करता त्यात अनेक विषारी धातू असल्याचं स्पष्ट झालंय. सेंटर फॉर सायन्स अँड इन्व्हायर्न्मेंट(सीएसई)च्या लॅबनं केलेल्या एका अभ्यासानुसार क्रीममध्ये पारा आणि लिपस्टिकमध्ये कॅन्सरकारक क्रोमियम असल्याचं स्पष्ट झालंय.
अभ्यासासाठी वैज्ञानिकांनी गोरं बनविण्याचा दावा करणाऱ्या ३२ सौंदर्य प्रसाधनांची तपासणी केली. त्यात जवळपास ४४ टक्के पारा सापडला. तर लिपस्टिकच्या ३० नमुन्यांमधून ५० टक्के क्रोमियम आणि ४३ टक्के निकेल सापडलं.
वैद्यकीय अभ्यासानुसार १४ सौंदर्य प्रसाधनांच्या नमुन्यांमध्ये ‘पारा’ची पातळी प्रति १० लाख नमुन्यांमध्ये ०.१० पासून १.९७पर्यंक होतं. तर ३० पैकी १५ लिपस्टिकच्या नमुन्यांमध्ये क्रोमियमची पातळी ही प्रति १० लाखांमध्ये ०.४५ ते १७.८३ आणि १३ नमुन्यांमध्ये निकेल १० लाखांमध्ये ०.५७ के ९.१८ सापडलं.
विशेष म्हणजे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट्स आणि रूल्स ऑफ इंडियाकडून सौंदर्य प्रसाधनांमध्ये ‘पारा’चा वापर करण्यावर बंदी आहे. कारण त्यामुळं किडनीवर परिणाम होतो.
अशा क्रीममुळं त्वचेच्या रंगांवर परिणाम तर होतोच शिवाय व्यक्तीमध्ये हे क्रीम नैराश्य, निराशा आणि विकृत मनस्थितीही निर्माण करतो. यामुळं शरीरातील मज्जासंस्थेवरही परिणाम होतो. तर क्रोमियम कॅन्सरला आमंत्रण देतो.
पर्यावरणवादी आणि सीएसईच्या संचालिका सुनीता नारायण म्हणाल्या की, सामान्यपणे सौंदर्य प्रसाधनांमध्ये पारा नको. मात्र सौंदर्य प्रसाधनांमध्ये पारा असणं हे बेकायदेशीर आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.