मोबाइल वापरताय सावधान, बाळावर होईल दुष्परिणाम

मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील एक गरजेची वस्तू बनली आहे. गर्भावस्था काळात मोबाईलचा वापर करणे घातक आहेत. याचा वाईट परिणाम जन्माला येणाऱ्या बाळावर पडतो.

Updated: Mar 12, 2013, 07:11 AM IST

www.zee24taas.com लंडन
मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील एक गरजेची वस्तू बनली आहे. गर्भावस्था काळात मोबाईलचा वापर करणे घातक आहेत. याचा वाईट परिणाम जन्माला येणाऱ्या बाळावर पडतो. एका संशोधनानुसार, जन्माला येणाऱ्या बाळाची शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता कमी दिसून येते असे आढळून आले आहे.
अमेरिका आणि डेन्मार्क देशातील शास्त्रज्ञानी १३ हजाराहून अधिक मुलांवर सर्व्हे केला, त्यात असे आढळून आले की, गर्भवती महिलांनी दिवसातून दोन-तीन वेळा मोबाईलचा वापर केला तर मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होते. यामुळे मुलांचा स्वभाव, नाती, मानसिकता यांच्यावर परिणाम होतो. जर सात वर्षाखालील मुले मोबाईल फोनचा वापर करीत असतील तर दुष्परिणाम वाढण्याची शक्यता अधिक असते. मोबाईल फोनच्या वापराने गर्भवती माहिलांवरच दुष्परिणाम होत नाही, तर लहान मुलांवर देखील वाईट परिणाम दिसून येतात.
संशोधनच्या काळात शोधकर्त्यांनी १३,१५९ मुलांच्या मातांशी संवाद साधला असता, त्यांना गर्भावस्था काळातील मोबाईलचा वापर आणि सात वर्षापर्यंत मुलांनी केलेला मोबाईलचा वापर यासंबंधी माहिती विचारण्यात आली. यावरुन असा निष्कर्ष काढण्यात आला की, ज्या महिला गर्भावस्था काळात मोबाईलचा वापर करतात त्याच्या मुलांमध्ये ५४ टक्के दुष्परिणाम होण्याची शक्याता वाढते.