२०१२ तुम्हाला प्रगतीचा रस्ता दाखवेल. गेल्या वर्षी चालू असणारा संघर्ष यावर्षी संपेल. तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात सुधारणा होतील. नवीन लोक भेटतील. जीवनाचे नवीन पैलू उलगडतील.
कामाच्या ठिकाणी, तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवून द्यायला नव्या संधी मिळतील. पण, त्यासाठी काही गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. निश्चय आणि मेहनत या दोन गोष्टी तुमच्या विकासाला हातभार लावतील. पण आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा. वाद-विवादाचे प्रसंग शक्यतो टाळा.
ग्रहमानानुसार या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत संपत्ती आणि प्रमोशन्स या गोष्टी मोठ्या प्रमाणावर मिळतील. एप्रिल-मे दरम्यान अपेक्षांचं ओझं वाढलेलं असेल. तुम्ही क्रिएटिव्ह तसंच अध्यात्मिक लोकाकंडे आकृष्ट व्हाल.
पैसा ही प्रेरणादायी शक्ती ठरेल. हे वर्ष महत्त्वाकांक्षी योजनांच्या दिशेने काम सुरू होणारं वर्षं आहे. तुम्ही प्रयत्न केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवतील. तुम्हाला एकाच वेळी अनेक संधी मिळतील. पण, कुठली संधी स्वीकारावी हे तुम्हाला अतिशय हुषारीने ठरवावं लागेल. तुमचा सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला गुंतागुंतीच्या घडमोडींमधून मार्ग काढेल.
वर्षाचे पहिले सहा महिने प्रकृती नाजूक असेल. अनपेक्षित आजार होण्याची शक्यता आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष न करता कामामधून आरोग्यासाठी पुरेसा वेळ द्या.