धनु (जुलै)

Updated: Jul 3, 2012, 07:23 PM IST


.

 

.

 

 

१ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२

 

स्पीड तुमचीआवड... जलदपणासाठी तुम्हाला या महिन्यातही हवाहवासा वाटेल. सर्व गोष्टी लवकरातलवकर व्हाव्यात, जीवन अगदी गतिमान पद्धतीनं चालावं यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल.

 

पण, मनासारखं न झाल्यामुळे जीवन अगदी उदासवाणं वाटेल. आत्मपरिक्षण आणि आत्मचिंतनाद्वारे या सुस्ततेचाही फायदा कसा घेता येईल याकडे लक्ष द्या. प्रयत्न मात्र कोणत्याही परिस्थितीत थांबवू नका. जीवनात प्रत्येक टप्प्यावर बदल आणि तोही सकारात्मक... कसा घडून येईल याकडे लक्ष द्या.

 

तुमच्या विचारांचा, बोलण्याचा वेगळ्या पद्धतीने अर्थ निघू शकतो. त्यामुळे बोलण्यात आणि वागण्यात सोप्यात सोप्या पद्धतीचा वापर करा. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करताना किंवा मोठ्या खरेदी करताना सावधान. प्रेम आणि घरगुती संबंधात गैरसमज होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही महत्त्वाच्या संबंधांबाबत कोणताही निर्णय घेताना अगोदर विचार करा.

 

शुभ दिवस – १, २,९, २१, २९