मुंबई : होळी आणि रंगपंचमीचा दिवस जवळ आला आहे. तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी जर सुंदर मॅसेजच्या शोधात असाल तर तुम्ही खाली दिलेले मॅसेज तुमच्या लोकांना पाठवू शकता आणि शुभेच्छा देऊ शकता.
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला
होळी पेटता उठल्या ज्वाला
दृष्टवृत्तीचा अंत हा झाला
सण आनंदे साजरा केला.
क्षणभर बाजुला सारु
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग, गुलाल उधळु
रंगवुया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.
रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्या-वेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा.
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.
आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…
रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहुदे रंग,
सौख्याचे – अक्षय तरंग!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.
रंगाच्या दुनियेत लहान-थोर दंगली
रंगबिरंगी रंगात चिंब-चिंब न्हाली!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.
Bhiju De Rang Ani Ang Swachhand,
Ankhand Udu De Mani Rang Tarang,
Vave Avghe Jeevan Dang,
Ase Udhluya Aaj He Rang.
Happy Rangpanchami
Jivnachya watewar Kalyanche bandh futun jatat,
Wahun jate sahwasache pani,
Tarihi Maitricha Ankur tag dharun rahto…
Karan bhijat rahtat tya Aathavani.
Happy Rangpanchami