मुंबई : जेव्हा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला सतत असं वाटत असतं की आपण त्या व्यक्तीसमोर चांगलं दिसावं. त्याव्यक्तीला आपण स्पेशल वाटावं. पण या गोष्टी करण्यात आपण काही चूका करून बसतो ज्याचा परिणाम संबंधावर होतो. त्यामुळे या ३ गोष्टी आपल्या पार्टनर समोर कधीच करू नका.
१. स्पष्टपणे बोलणे : तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत जे काही बोलत असाल ते स्पष्टपणे बोला. जर तुम्हाला तुमच्या भावना शब्दातून मांडता येत नसतील तर त्यावेळेस त्या बोलावून दाखवूच नका. योग्य वेळेची वाट पाहा. अन्यथा समोरच्याला त्याचा दुसरा अर्थ वाटू शकतो.
२. भावनांवर नियंत्रण : कोणत्याही गोष्टीवर हसणे किंवा लगेच प्रतिक्रिया देणे टाळा. कारण कधी कधी समोरच्या व्यक्तीला तुमचा राग येऊ शकतो. यामुळे तुम्ही किती समझदार आहात हे देखील कळतं. त्यामुळे संपूर्ण गोष्ट व्यवस्थित ऐकूणच त्यावर बोला.
३. एक टक न बघणे : तुम्ही जरी त्या व्यक्तीला पंसद करत असलात तरी त्या व्यक्तीकडे तुम्ही एकटक बघत बसू नका. यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते. त्या व्यक्तीसोबत मित्रांप्रमाणे वागा हे फायद्याचं राहिल.