सहा तासांपेक्षा जास्त वेळ भारतीय इंटरनेटवर...

देशात इंटरनेटचं महत्त्व किती आहे? हे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात समोर आलंय. 

Updated: Oct 1, 2014, 12:08 PM IST
सहा तासांपेक्षा जास्त वेळ भारतीय इंटरनेटवर... title=

नवी दिल्ली : देशात इंटरनेटचं महत्त्व किती आहे? हे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात समोर आलंय. 

जवळपास ४६% भारतीय दररोज आपल्या दिवसातले जवळपास सहा तास किंवा यापेक्षाही जास्त तास इंटरनेटवर घालवतात, असं या सर्वेक्षणात समोर आलंय. इंटरनेट बंद असेल तर आपलं काही तरी हरवलंय, असा भास आपल्याला सतत होत राहतो किंवा तशी भीती मनात कायम असते, असं सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास ८२% व्यक्तींचं म्हणणं होतं. 

टाटा कम्युनिकेशन्सनं आपल्या ‘कनेक्टेड वर्ल्ड-२’ आपल्या रिपोर्टमध्ये हे निष्कर्ष मांडलेत. भारतातील जवळपास ४६ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, ते प्रत्येक दिवशी ६ तास किंवा यापेक्षा अधिक वेळ इंटरनेटवर व्यतीत करतात. 

सर्व्हेक्षणात फ्रान्स, जर्मनी, भारत, सिंगापूर, अमेरिका आणि ब्रिटन इथले जवळपास ९,४१७ इंटरनेट युजर्सना सहभागी करून घेण्यात आलं होतं. तर भारतातल्या २,११७ इंटरनेट युजर्स यात सहभागी झाले होते. 

अहवालानुसार, जवळपास ५६ टक्के भारतीयांच्या म्हणण्यानुसार, ते इंटरनेटशिवाय पाच तासांपेक्षा जास्त वेळ राहूच शकत नाहीत. 

यामध्ये, भारतीय पुरुष महिलांच्या प्रमाणात अधिक वेळ इंटरनेटवर घालवतात. परंतु, जवळपास २१ टक्के महिला इंटरनेटशिवाय राहू शकत नाहीत. तर केवळ १६ टक्के पुरुषांना इंटरनेट नसेल तर काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहतं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.