महिलांपेक्षा पुरुषच अधिक खोटं बोलतात, पाहा त्यांचे ५ असत्य वचन

नुकताच झालेला एक सर्व्हे सांगतो की, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक खोटं बोलतात. यामुळं महिलांचा संशय बळावतो. जेव्हा आपल्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळत नाही तेव्हा आपल्या पार्टनरला संशयाच्या दृष्टीनं पाहिलं जातं.

Updated: Sep 22, 2015, 08:56 PM IST
महिलांपेक्षा पुरुषच अधिक खोटं बोलतात, पाहा त्यांचे ५ असत्य वचन title=

मुंबई: नुकताच झालेला एक सर्व्हे सांगतो की, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक खोटं बोलतात. यामुळं महिलांचा संशय बळावतो. जेव्हा आपल्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळत नाही तेव्हा आपल्या पार्टनरला संशयाच्या दृष्टीनं पाहिलं जातं.

खोटं काय बोलावं आणि कशासाठी हे प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असतं. मात्र जिथं काही असत्य नात्यांमध्ये गोडवा आणतो तर काही खोटं बोलणं नातं तोडतं. 

आणखी वाचा - सुंदर मुलींना सर्वसामान्य दिसणारे मुलं का आवडतात?

पुरुष अनेकदा आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी खोटं बोलतात, ज्याला आपण चुकीचं नाही म्हणून शकत. प्रेम करण्याची ती एक पद्धत असू शकते. पण अनेकदा पुरुष आपल्यातील कमतरता आणि आपली चूक लपविण्यासाठी खोटं बोलतात. सामान्यपणे पुरुषांचे काही कॉमन खोटे स्टेटमेंट असतात. 

पाहा त्याचीच काही उदाहरण- 

१. मी तिच्याकडे पाहत नव्हतो - रस्त्यानं जातांना किंवा रेस्टॉरंटमध्ये एखादी सुंदर मुलगी दिसली. तर तिच्याकडे डोळे फाडून बघत असतांनाही पुरुष ते स्वीकारत नाही. मी तिच्याकडे पाहत नव्हतो, असंच ते सांगतात. 

२. मी सिगारेट पिणं सोडलंय - साफसफाई करतांना जर आपल्याला नवऱ्याच्या किंवा प्रियकराच्या पाकिटात सिगारेटचं रिकामं पाकिट मिळालं, तर त्याबद्दल पुरुष नेहमी खोटं बोलतात. ते सिगारेटचं पाकिट आपलंच आहे आणि आपण सिगारेट संपवल्या हे ते कधीच कबुल करत नाहीत. 

३. मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणासोबतही संबंध बनवू इच्छित नाही - या मुद्द्यावर पुरुष नेहमी खोटं बोलतात. भले ही त्यांनी दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवण्याबद्दल खरोखर विचार केला नसेल पण त्याच्या फँटसीमध्ये काही न काही नक्की असतं. मॉडल्स आणि हिरोईन बद्दल जवळपास प्रत्येक पुरुष फँटसी पाळतो पण विचारलं तर खोटं सांगतो.

४. मी तुझ्याशिवाय एका दिवसापेक्षा जास्त राहू शकत नाही - जर आपलं लग्न झालेलं असेल तर हे आपण कधी ना कधी नक्की ऐकलं असेल. जेव्हा पण आपण माहेरी जाणार असाल आणि ते नवऱ्याला सांगत असाल तेव्हा नवरा हा डायलॉग मारत असेल. पण खरंतर अधिकाधिक नाही तर जवळपास सर्वच पुरुषांना वाटत असतं आपली पत्नी काही दिवसांसाठी घरापासून दूर जावी, म्हणजे त्यांना बॅचलर्स लाइफ जगता येईल.

५. मी झोपलो नव्हतो, विचार करत होतो- आपण जेव्हा आपल्या पती किंवा बॉयफ्रेंडला दिवसा किंवा संध्याकाळी झोपलेलं पकडता. तेव्हा त्यांचं उत्तर हेच असतं मला झोप नाही आली, मी विचार करत होतो. जेव्हा की त्यांना झोप आलेली असते आणि डुलकीही लागलेली असते. पण खोटं बोलणं त्यांची जुनी सवय असते. 

आणखी वाचा - महिलांच्या मनातील काही रहस्य आणि गुपितं

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.