मुंबई : आज खूप कमी लोकं अशी सापडतील ज्याचं फेसबूक अकांऊट नाही. आज प्रत्येकाला फेसबूकवर हजारो मित्र बनवायचे आहेत. एखादा फोटो टाकला तर त्याला 100 लाईक्स मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी गरज असते ती तुम्हाला फेसबूकवर प्रसिद्ध होण्याची.
तुम्ही या 5 गोष्टी केल्या तर तुम्ही फेसबूकवर अधिक प्रसिद्ध होऊन तुम्हांला अधिक लाइक्स मिळू शकतात.
1. प्रोफाईल आणि कव्हर पिक्चरसाठी स्वत:चे काही चांगले फोटोस निवडा. तुमचा तो फोटो इंटरेस्टींग हवा जो इतरांना आकर्षित करणारा हवा. दोन्ही फोटोमधील कलर कॉम्बिनेशन ही त्यासाठी महत्त्वाचं ठरतं. उदा. स्वत:चा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढा आणि तो प्रोफाईल फोटो म्हणून वापरा. त्यानंतर जंगलात चालत असतांनाचा ब्लॅक आणि व्हाईट फोटो तुम्ही कव्हर फोटो म्हणून वापरू शकतात.
2. तुमचा प्रोफाईल फोटो आणि कव्हर फोटो एकमेकांना जुळत असणारा हवा. ज्यामुळे तुमचं प्रोफाईल अजून आकर्षित दिसेल.
3. तुम्ही अशा पोस्ट शेअर करा ज्यातून तुम्ही खूप समजूतदार आणि खूप मोठे व्यक्ती आहात असं समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे. त्याला तुमच्यासोबत चर्चा करण्याची इच्छा झाली पाहिजे. तुमच्या सोबत समोरच्या व्यक्तीने चर्चा केल्यानंतर तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो असं वाटलं पाहिजे.
4. नेहमी सकारात्मक पोस्ट शेअर करा. ज्यामुळे तुम्ही खूप सकारात्मक विचार करणारे व्यक्ती आहेत असं समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे. समोरचा व्यक्ती कोणत्याही अडचणीत असेल तर त्याला ती गोष्ट तुमच्योसोबत शेअर करण्याची इच्छा झाली पाहिजे.
5. नेहमी मनोरंजक आणि छान गोष्टी शेअर करा. गंमती, मनोरंजक गोष्टी, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचा दिवस आनंदीत जाईल अशा पोस्ट शेअर करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.