कारच्या डॅशबोर्डवरून हाताळा आपला अॅन्डॉईड फोन...

बरीच चर्चा झाल्यानंतर अखेर बुधवारी गूगलनं आपला कारसाठी बनवलेला स्पेशल प्रोजेक्ट ‘अॅन्ड्रॉईड ऑटो’ सादर केलाय. कंपनीनं आपल्या वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये कारसंबंधित या प्रोजेक्टची पुढील टप्प्यांची माहिती दिलीय. 

Updated: Jun 27, 2014, 03:29 PM IST
कारच्या डॅशबोर्डवरून हाताळा आपला अॅन्डॉईड फोन...   title=

मुंबई : बरीच चर्चा झाल्यानंतर अखेर बुधवारी गूगलनं आपला कारसाठी बनवलेला स्पेशल प्रोजेक्ट ‘अॅन्ड्रॉईड ऑटो’ सादर केलाय. कंपनीनं आपल्या वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये कारसंबंधित या प्रोजेक्टची पुढील टप्प्यांची माहिती दिलीय. 

आपल्या स्मार्टफोनमधील विविध अॅप्लिकेशन्स-फिचर्स आणि आपल्या गाडीतील टचस्क्रीन असलेल्या डॅशबोर्डला जोडण्यासाठी ‘अॅन्ड्रॉईड ऑटो’ उपयोगात येणार आहे. टच स्क्रीनसोबतच ‘व्हॉईस कमांड’ची सुविधाही यामध्ये देण्यात आलीय. त्यामुळे डॅशबोर्डच्या स्क्रीनला टच न करता तुम्ही केवळ तुमच्या आवाजानं तुमचा कार फोनला कमांड देऊ शकता. अर्थातच, यामुळे कारच्या स्टिअरिंगवरून हात काढण्याची आवश्यकता नाही. 
वर्षाच्या अखेरपर्यंत ‘अॅन्ड्रॉईड ऑटो’च्या सुविधांसहीत गाड्या बाजारात असतील, असा विश्वास गूगलनं व्यक्त केलाय. ‘अॅप्पल’नं याआधी ‘कार प्ले’ नावाचं तंत्रज्ञान सादर केलंय. मात्र, गूगलचे हे नवीन तंत्रज्ञान अॅन्ड्रॉईड फोनसाठी जास्त फ्रेंडली असेल.

‘अॅन्ड्रॉईड ऑटो’चं स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी तब्बल 28 कार कंपन्या आणि एनव्हीडीया या टेक कंपन्यांनी एकत्र येऊन ‘ऑटोमेटिव अलायन्स’ची स्थापना केलीय. कार डिव्हाईस आपल्या अॅन्ड्रॉईड डिव्हाईसलाच जोडून त्याचा फायदा वाहन चालकाला गाडी चालवताना व्हावा, हा यातील मुख्य हेतू आहे. गूगलने ज्या कार कंपन्यासोबत करार केलाय त्यामध्ये, बेंटले, फरारी, ऑडी, फोर्ड, निसान, माझदा, सुझुकी, स्कोडा आणि होंडा या कंपन्यांचाही समावेश आहे.  

कसा करता येतील ‘अॅन्ड्रॉईड ऑटो’चा वापर...
‘अॅन्ड्रॉईड ऑटो’च्या साहाय्यानं तुम्ही तुमच्या मोबाईमधील गाणी ऐकण्यासाठी आणि हाताळण्यासाठी कारच्या डॅशबोर्डचा वापर करू शकता. तसंच या डॅशबोर्डवरून तुम्ही ट्रॉफिकची परिस्थिती समजून घेऊ शकता किंवा गूगल मॅपचा वापरही करू शकता. तुमच्या फोनवर आलेले मॅसेजेसदेखील हे तंत्रज्ञान तुमच्यासाठी वाचून दाखवेल आणि तुम्ही केवळ तोंडानं त्या मॅसेजला रिप्लायही करु शकता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.