फेसबुकवर अश्लील फेक अकाऊंट पाहून मुलीची आत्महत्या

Updated: Jun 27, 2014, 04:34 PM IST
फेसबुकवर अश्लील फेक अकाऊंट पाहून मुलीची आत्महत्या title=

 

कोलकता : आपल्या नावानं फेक फेसबुक प्रोफाईल बनवून आपलाच छेडछाड केलेला फोटो पाहिल्यानंतर एका 18 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

पोलीस उपायुक्त आर. खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत मुलगी अकरावीमध्ये शिकत होती. मंगळवारी रात्री बेहला पोलीस स्टेशन क्षेत्रात येणाऱ्या आपल्या घरातच तीनं फाशी घेत आत्महत्या केलीय.  

संबंधीत मुलीची ऑनलाईन माध्यमातून एका तरुणासोबत मैत्री झाली होती... त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद होऊन दोघे वेगळे झाले होते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलीय.  

संबंधीत विद्यार्थीनीनं आत्महत्या करण्याअगोदर सहा पानांचं एक पत्रही लिहिलंय. याच आधारावर, इमान खान आणि त्याच्या दोन मित्रांनी दीपक आणि सतीश यांना कलम 305 आणि आयटी अधिनियमांतहत अटक करण्यात आलीय.

फेसबुक अकाऊंटवर आपला अश्लील पद्धतीनं एडिट केलेला फोटो पाहून संबंधीत तरुणीनं आत्महत्या केलीय. अकाऊंटवर तिचा टेलिफोन नंबरही टाकला गेला होता. तिचा मित्र फैजल इमान खान यानं हा नंबर प्रोफाईलवर टाकल्याचं सांगण्यात येतंय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.