मुंबई : अँड्राईड आणि विंडोजसाठी सोळावं नाही तर पंधरावं म्हणजेच २०१५ देखिल धोकादायक आहे. कारण तंत्रज्ञान जसे वेगाने सुधारत जातेय तसेच त्यातील धोकेही वाढत आहेत.
दिवसेंदिवस जगभरात अँड्रॉइड, विंडोजचे युझर्स वाढत आहेत. त्यामुळे आजच्या घडीला आयटी सुरक्षेच्या बाबतीत सजग राहण्याचीही गरज आहे. गेल्या वर्षात अँड्रॉइड आणि विंडोज प्लॅटफॉर्मवर 'रॅन्समवेअर'चा वाढता प्रभाव पाहता 'क्विक हील'ने २०१४मधील थ्रेट्सचा (धोक्यांचा) अभ्यास करून '२०१५ : थ्रेट रिपोर्ट' प्रकाशित केला आहे. त्यात 'रॅन्समवेअर' हा २०१५ सालातील सर्वांत मोठा धोका असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
'रॅन्समवेअर' म्हणजे काय?
'रॅन्समवेअर' हा एक प्रकारचा मालवेअर म्हणजेच घातक प्रोग्राम आहे. जो कॉम्प्युटर वापरात अडथळे आणतो. याशिवाय पेड अॅप्सचे निर्बंध काढून टाकण्याची विनंती करून, प्रत्यक्ष व्यवहार करण्याची धमकीही देतो.
विंडोजवर धुमाकूळ घातल्यानंतर 'रॅन्समवेअर' आता अँड्रॉइडसाठीही सज्ज झालाय. गेल्या वर्षी प्रामुख्याने अँड्रॉइड कोलर, अँड्रॉइड सिम्पलॉकर, अँड्रॉइड सेल्फमाईट, अँड्रॉइड ओल्डबूट, अँड्रॉइड टोरेक अशा 'रॅन्समवेअर्स'ची लागण झालेली दिसून आली. त्यांचा प्रभाव या वर्षी अधिक जाणवेल, असे मत तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.