मुंबई : तुम्हालाही सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहायची सवय लागली आहे? तुम्हालाही जेवतानाही मोबाईल नजरेआड करणे कठीण झालंय? तुम्हीही महत्त्वाच्या मिटिंग दरम्यान सतत मोबाईल चेक करत राहता? या प्रश्नांची उत्तरं 'हो' असं असेल तर तुम्हालाही 'टेक थेरपी'ची गरज आहे.
आपण दिवसातील किती वेळ मोबाईलवरील ईमेल, वॉट्सअॅप, फेसबुक, पाहाण्यात घालवतो, जरा विचार करा. ब्रिटनसारख्या देशांमधील लोक आठवड्याभरात दोन दिवसांएवढा वेळ मोबाईलवरील नोटिफिकेशन पाहण्यात घालवतात. इतकंच नाही तर एक चतुर्थांश लोक दिवसभरात 50 हून अधिक वेळा त्यांचा मोबाईल विनाकारण पाहतात. तंत्रज्ञानावर आधारित जगातील हे एक सत्य आहे ज्याचे सगळेच गुलाम होत चालल्याचं चित्र आपल्यासमोर आहे.
किंमत कम्पॅरिझन वेबसाईट comparethemarket.com ने केलेल्या संशोधनातून हे सिद्ध झालंय की जर एखाद्याला 24 तास मोबाईलपासून ठेवले तर त्याला मानसिक ताण जाणवू लागतो. अर्थात तंत्रज्ञानाची सवय आपल्या मानसिक क्षमतेवर परिणाम करते.
फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या अतिवापरामुळे नातेसंबंधामध्ये ताण निर्माण होतो. याच कारणामुळे अमेरिकेनंतर आता ब्रिटनसारख्या देशांमध्येही 'अनप्लगिंग डे'सारखे उपक्रम राबवले जात आहेत. इंग्लडमधील या विषयावर संशोधन करणारे डॉ. रिचर्ड ग्रॅहम यांच्या म्हणण्यानुसार 'बहुतांश लोक दिवसभरात जास्तीत जास्त वेळ ऑनलाईन असतात. अशाने आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होणं स्वाभाविक आहेट.
डॉ. ग्रॅहम सोशल मीडियावर पोस्ट टाकून लाईकसाठी वाट पाहण्यालाही एक प्रकारची विचित्र सवय मानतात. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर सतत वेळ घालवणं हेही तितकंच धोकादायक आहे. बरेच लोक दिवसभरातील नियोजनासाठी टू-डू लिस्टचा पर्याय निवडतात परंतु काम सोपे होण्याऐवजी त्यांच्यात चिडचिड वाढते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.