मुंबई : असूसने नुकताच झेनफोन ३ सीरीजच्या स्मार्टफोनचा टीझर लाँच केला होता. हा स्मार्टफोन ३० मेला लाँच केला जाणार आहे. मात्र लाँचआधी झेनफोन ३चे फीचर्स लीक झालेत.
या नव्या स्मार्टफोनमध्ये क्वाडकोर क्वालमन स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉईड ६.० मार्शमेलोवर आधारित असेल.
तसेच याचा रेयर कॅमेरा २३ मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेल आहे. दरम्यान, या स्मार्टफोनच्या बाकी फीचर्सची माहिती मिळू शकलेली नाही.