ही बाईक चालते पाण्यावर

पाण्यावर चालणारी बाईक. ऐकून हैराण झालात ना? तुम्ही म्हणालं कसं शक्य आहे? मात्र हे शक्य आहे. दहावीच्या नित्याशीष भंडारी या विद्यार्थ्यानं हे करुन दाखवलंय.  एक लीटर समुद्राच्या पाण्यावर ही बाईक तब्बल २५० किलोमीटर अंतर प्रवास करु शकते.

Updated: Nov 28, 2015, 03:17 PM IST
ही बाईक चालते पाण्यावर  title=

चंदीगड : पाण्यावर चालणारी बाईक. ऐकून हैराण झालात ना? तुम्ही म्हणालं कसं शक्य आहे? मात्र हे शक्य आहे. दहावीच्या नित्याशीष भंडारी या विद्यार्थ्यानं हे करुन दाखवलंय.  एक लीटर समुद्राच्या पाण्यावर ही बाईक तब्बल २५० किलोमीटर अंतर प्रवास करु शकते.

ऑक्सी हायड्रोजन किटच्या सहाय्याने त्याने हा अजब गजब शोध लावलाय. ही किट पाण्याला ऑक्सी हायड्रोजन गॅसमध्ये रुपांतरित करते. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अत्यंत सुरक्षित सफर तुम्ही करु शकता. नित्यशीष भंडारी हा सरकारी मॉडेल सीनियर सेकंडरी शाळेत दहावीचा विद्यार्थ्यी आहे. त्याने ही बाईक ४२व्या राज्यस्तरीय विज्ञान गणित आणि पर्यावरण प्रदर्शन २०१५ मध्ये ठेवली होती. 

पेट्रोल आणि डिझेलमुळे उत्सर्जित होणारा कार्बन गॅस ग्लोबल वॉर्मिंगसाठी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. त्यामुळे इकोफ्रेंडली बाईक बनवण्याचा विचार केला. ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. बाजारातील ऑक्सी हायड्रोजन सेलच्या तीन प्लेट्स 3/6 या आकारात कापण्यात आल्या. त्यानंतर या प्लेट्सना इंजिनमध्ये फिट बसवण्यात आलं. या प्लेट्स पाण्याला ऑक्सी हायड्रोजन गॅसमध्ये रुपांतरित करतात, असे नित्याशीषने यावेळी सांगितले. 

यासाठी नित्याशीषला केवळ १९ रुपयांचा खर्च आला. इतके कमी पैसे खर्च करुन एक सामान्य बाईक पाण्यावर चालायला लागली. या किटचा आकार लहान असल्याने त्या कुठेही फिट बसतात. छोट्या कारमध्येही अशा किट बसवता येऊ शकतात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.