मुंबई: ब्लॅकबेरी सध्या आपल्या पहिल्या अँड्रॉइड स्मार्टफोन वेनिसवर काम करतेय. मात्र नुकताच त्याचा फोटो लीक झालाय. आता या फोनचे काही फोटो आणि डिटेल्स सुद्धा लीक झाले आहेत.
ब्लॅकबेरी वेनिसचे डिटेल्स आणि फोटो तायवानची एक वेबसाइट Tinhte ने आपल्या वेबसाइटवर अपलोड केलेत. या वेबसाइटमध्ये ब्लॅकबेरीच्या अँड्रॉइड फोनला स्लायडर Querty कीबोर्ड आणि अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनसह दाखवण्यात आलंय.
आणखी वाचा - अनहॅकेबल, अनब्रेकेबल आणि वॉटरप्रुफ फोन
काही इतर वेबसाइट्सनी फोनची माहिती टाकलीय यात फोनमध्ये QHD (१४४०X२५६०) डिस्प्ले असल्याचं सांगितलंय. तायवानची वेबसाइट Tinhte नुसार या फोनमध्ये 3GB रॅम असेल आणि ३००० mAhची बॅटरी असेल.
लीक माहितीनुसार यामध्ये ६४ बिट स्नॅपड्रॅगन ८०८ प्रोसेसर लागलंय, ज्याची स्पीड १.८GHz असेल आणि १८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल.
आणखी वाचा - ६ मिनीटांत करा स्मार्टफोन फुल्ल चार्ज, सोबत मिळवा ७ दिवसांचा बॅकअप
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.