www.24taas.com, हरिद्वार
गंगा किनाऱ्याच्या छोरीच्या प्रेमात वेडा झालेला बिजनौरचा फैजल खान आपले नाव बदलून वरात घेऊन धर्मनगरी हरिद्वार पोहचला. प्रेयसीच्या कुटुंबियाना आपली खरी ओळख सांगितली नाही आणि संपूर्ण लग्नाची तयारी करायला सांगितली. लग्नाला पाहुणेमंडळी आणि नातलगांतच्या उपस्थितीत राजबीर चौहान बनलेला फैजल हा सप्तपदी घेणार असतानाच प्रेयसीच्या एका नातलगाला फैजलची खरी ओळख पटली आणि झाला जोरदार हंगामा....

फैजलची ओळख पटल्यावर लग्नमंडपात खूपच गोंधळ निर्माण झाला. काही हिंदू संघटना यावेळी घटनास्थळी पोहचल्या. पोलिस आल्यावर आपल्या प्रियकराला अडकताना पाहून प्रेयसीने त्याची बाजू मांडण्यास सुरूवात केली. कुटुंबियांनी समजावले तरी दोघांना वेगळं राहण मान्य नव्हतं.

आठ महिन्यांपूर्वी फेसबुकद्वारे बिजनौरच्या या युवकाचे आणि हरिद्वारच्या तरुणीचे सूत जुळले. बिजनौर येथे एका मोबाईल दुकानावर काम करणाऱ्या फैजलबाबत सर्व माहित होते. मात्र, दोघांनी आपल्या परिवाराला फसवले आणि फसवून लग्न करायचे ठरवले. फैजलाची ओळख मुलीने आपल्या कुटुंबाला राजबीर चौधरी म्हणून करून दिली. तर फैजलने आपल्या जिवंत आई-वडिलांना मृत असल्याचे सांगितले. दोघांचे लग्न गेल्या रविवारी निश्चित झाले.
गेल्या रविवारी वरात घेऊन आलेल्या फैजलचे काही विधी पूर्ण झाले मात्र, एका नातेवाईकाने फैजलची खरी ओळख उपस्थितांना सांगितली आणि झाला एकच गोंधळ.... यानंतर या ठिकाणी काही हिंदू संघटना आल्या. पोलिस आले. आपल्या प्रियकराला या प्रकरणात अडकताना पाहिल्यावर प्रेयसीने खरे सांगितले. कुटुंबाने समजवले तरी दोघे एकमेकांना सोडण्यास तयार नाही. या प्रकरणात तरुणीच्या प्रेमात वेडा झालेला फैजल धर्म बदलून हिंदू होण्यासही तयार आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
boyfriend-wants-to-change-religion-for-marriage
Home Title: 

फेसबुकवर झाले प्रेम, पण धर्म बनला आडकाठी!

No
155924
No
Authored By: 
Prashant Jadhav