CBSEचा १२वीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी

सीबीएसईचा बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. मुलींनी या परीक्षेत बाजी मारलीये. एकूण ८२ टक्के निकाल लागलाय.

Updated: May 25, 2015, 01:59 PM IST
CBSEचा १२वीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी title=

मुंबई: सीबीएसईचा बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. मुलींनी या परीक्षेत बाजी मारलीये. एकूण ८२ टक्के निकाल लागलाय.

देशभरातून सुमारे साडे दहा लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. ८७.५६ टक्के विद्यार्थिनी आणि ७७.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

सीबीएसईच्या http://cbseresults.nic.in/ या वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना वेबसाईटवर निकाल पाहणं शक्य नाही, ते मोबाईलवरुन एसएमसद्वारे निकाल मागवू शकतात.
 
जर तुम्हाला एसएमएसद्वारे निकाल मागवायचा आहे, तर तुम्ही मोबाईल कंपनीनुसार खाली दिलेल्या नंबरवर एसएमस करु शकता. 

BSNL - CBSE 12 roll no Send SMS to 57766 
Vodafone-  CBSE 12 roll no Send SMS to 58888111
IDEA-  CBSE 12 roll no Send SMS to 58888111
AIRCEL-  CBSE 12 roll no Send SMS to 58888111
RELIANCE-  CBSE 12 roll no Send SMS to 58888111

 
उदाहरणार्थ- जर तुमचा रोलनंबर ४५३४५५६ आहे आणि तुमचं सीमकार्ड वोडाफोनचं आहे. तर टाईप करा-  CBSE 12 4534556 आणि मॅसेज करा 58888111 या नंबरवर...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.