चाँद नवाबचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

'यू-ट्यूब' आणि यानंतर 'बजरंगी भाईजान' चित्रपटानंतर चर्चेत आलेले पाकिस्तानचे पत्रकार चाँद नवाब, याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 4, 2015, 04:43 PM IST
चाँद नवाबचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल title=

इस्लामाबाद : 'यू-ट्यूब' आणि यानंतर 'बजरंगी भाईजान' चित्रपटानंतर चर्चेत आलेले पाकिस्तानचे पत्रकार चाँद नवाब, याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

एका न्यूज चॅनेलसाठी चाँद नवाब लाईव्ह देत असतांना, मध्येच एक लहान मुलगा आला आणि त्याला चाँद नवाब यांनी टपली मारली. 

खाली व्हिडीओत ही मारलेली टपली एवढ्या वेळेस पुन्हा-पुन्हा दाखवण्यात आली आहे की, चाँद नवाब यांनी या मुलाला खूप मारलंय असं वाटतं, पण प्रत्यक्षात चाँद नवाब यांनी हलकीशी टपली मारली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.