'व्हॉटसअपमुळे होतेय जोडीदारांची फसवणूक'

'व्हॉटसअप'मुळे तुमच्या नात्यांवर प्रभाव पडतो... इतकंच नाही, व्हॉटसअपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक करत आहेत, असं एका धर्मगुरुंनी म्हटलंय. 

Updated: Mar 7, 2015, 01:30 PM IST
'व्हॉटसअपमुळे होतेय जोडीदारांची फसवणूक' title=

नवी दिल्ली : 'व्हॉटसअप'मुळे तुमच्या नात्यांवर प्रभाव पडतो... इतकंच नाही, व्हॉटसअपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक करत आहेत, असं एका धर्मगुरुंनी म्हटलंय. 

पेरुची राजधानी लीमाचे धर्मगुरु जुआन लुईस सिप्रीआनी थ्रोन, यांनी हे विधान केलंय. ते एका रेडिओ कार्यक्रमात बोलत होते. 

व्हॉटसअपमुळे अनके वैवाहिक लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होत असल्याचं धर्गुरू जुआन यांनी म्हटलंय. 

'माझा मागासलेल्या विचारधारेवर विश्वास नाही... परंतु, कुणाला तरी ही गोष्ट समोर आणायलाच हवी. आपल्याला हे पाहावंच लागेल की किती लोक व्हॉटसअपमुळे आपल्याच जवळच्या व्यक्तींची फसवणूक करत आहेत' असंही त्यांनी म्हटलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, व्हॉटसअप हे आत्तापर्यंतचं सर्वांत मोठं मॅसेजिंग अॅप्लीकेशन ठरलंय आणि या अॅप्लिकेशनचे जगभरात जवळपास सात करोडोंहून अधिक युझर्स आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.