कोण आहे ही 'एअरटेल ४जी गर्ल'?

शॉर्ट केस...जीन्स टॉपमध्ये वावरणारी...प्रत्येकाला एअरटेल ४जी चँलेज करणारी मुलगी आता देशभरातील लोकांच्या ओळखीची झालीये. भले तिला तिच्या नावाने कोणी ओळखत नसेल मात्र एअरटेल ४जी गर्ल अशी तिची नवी ओळख देशभरात झालीये.

Updated: Dec 3, 2015, 10:45 AM IST
कोण आहे ही 'एअरटेल ४जी गर्ल'? title=

नवी दिल्ली : शॉर्ट केस...जीन्स टॉपमध्ये वावरणारी...प्रत्येकाला एअरटेल ४जी चँलेज करणारी मुलगी आता देशभरातील लोकांच्या ओळखीची झालीये. भले तिला तिच्या नावाने कोणी ओळखत नसेल मात्र एअरटेल ४जी गर्ल अशी तिची नवी ओळख देशभरात झालीये.

तुम्हाला कोणी विचारलं की साशा छेत्रीला ओळखता का तर अधिक लोकांचे उत्तर नाही असेच असेल मात्र जर तुम्हाला एअरटेल ४जी गर्लला कोण ओळखतं असा विचारलं तर सगळ्यांचे उत्तर हो असेच असले. 

उत्तराखंडच्या डेहराडूनची रहिवासी असलेली साशा मुंबईतल्या झेवियर्स ऑफ कम्युनिकेशन्स येथून जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेत आहे. एअरटेल ४जी कँपेननंतर देशातील तब्बल १.२ अरब लोक तिला ओळखायला लागलेत. 

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंसिल इंडिया (बीएआरसी)च्यानुसार १९ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर २०१५ पर्यंत साशा छेत्रीची एअरटेलची जाहिरात ५४ हजार ४०६ वेळा दाखवण्यात आली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.