या डॉक्टरला सांगावं लागतंय, 'अरे मी जिवंत आहे'

बिहारमधील एका डॉक्टरच्या घरी आयकर विभागाचा छापा पडला, यात ६ कोटी रूपये सापडले.

Updated: Nov 17, 2016, 01:30 PM IST
या डॉक्टरला सांगावं लागतंय, 'अरे मी जिवंत आहे' title=

छपरा : बिहारमधील एका डॉक्टरच्या घरी आयकर विभागाचा छापा पडला, यात ६ कोटी रूपये सापडले, आणि डॉक्टरचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला, अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

मात्र प्रत्यक्षात ६५ वर्षीय डॉक्टर आर बी सिन्हा यांच्या घरी ना इनकम टॅक्सची रेड पडली होती, ना त्यांचा हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता.

डॉ. सिन्हा यांना एक पत्रकार परिषद बोलवावी लागली यात त्यांना आपण जिवंत असल्याचं सांगावं लागलं, कारण काही न्यूज चॅनेल्सचे पत्रकार जेव्हा त्यांच्या घरी आले, तेव्हा त्याचे फोटोही लोकांनी व्हॉटस अॅपवर टाकल्याने, ही अफवा आणखी जास्त पसरली. डॉ. सिन्हा यांनी २ न्यूज चॅनेल्सना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.