मुंबई : जिओने आणखी इतर मोबाईल कंपन्यांना दणका देण्याचे ठरविले असून आता स्वस्तातील ४ जी फोन आणण्याची तयारी केलीआहे. या फोनची किंमत १ ते दीड हजार रुपयांच्या आसपास असणार आहे.
या स्वस्त फोनमध्ये ग्राहकांना अमर्याद व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग, तसंच इंटरनेट डेटाही अगदी कमी दरात दिला जाणार आहे.
सध्या बाजारात स्वस्त 4जी स्मार्टफोनची किंमत ३ हजार रुपये आहे. पण इतर टेलिकॉम कंपन्यांचे आणखी कंबरडे मोडण्यासाठी रिलायन्स जिओने ही खेळी खेळली आहे.
रिलायन्सचा हा नवा फोन वरिष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील जनतेला लक्षात घेऊ काढला आहे.