फेसबुकवर लिहल्यानंतर अमळनेर न.पा. लागली कामाला

लहान शहरांमध्ये देखील सोशल नेटवर्किंगवर व्यक्त होणाऱ्या गोष्टींची दखल प्रशासन आणि लोकप्रतिनीधींकडून घेतली जात असतांना दिसतेय. आयकर विभागाचे सहआयुक्त संदीपकुमार सांळुखे आपल्या गावी अमळनेर शहरात आपल्या घरी आले आहेत. 

Updated: Oct 22, 2014, 06:37 PM IST
फेसबुकवर लिहल्यानंतर अमळनेर न.पा. लागली कामाला title=

जळगाव : लहान शहरांमध्ये देखील सोशल नेटवर्किंगवर व्यक्त होणाऱ्या गोष्टींची दखल प्रशासन आणि लोकप्रतिनीधींकडून घेतली जात असतांना दिसतेय. हे अभिनंदनीय आहे,  

आयकर विभागाचे सहआयुक्त संदीपकुमार सांळुखे आपल्या गावी अमळनेर शहरात आले आहेत.अमळनेरात सहा दिवस राहिल्यानंतर त्यांना आलेला अनुभव त्यांनी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर शेअर केला. 

यात संदीपकुमार साळुंखे यांनी, आपल्या भागात सहा दिवसापासून पाणीपुरवठा झाला नसल्याचं सांगितलं, याबाबतीत त्यांनी पहिल्यांदा नगरपालिका कर्मचाऱ्याला फोन केला, मात्र त्याचा काहीही फरक पडला नाही. 

यानंतर त्यांनी आपण या बाबतील नगराध्यक्षांना भेटणार असल्याचं त्यांनी लिहलं, यानंतर त्यांच्या या स्टेटसखाली अनेक प्रतिक्रिया येत होत्या.बहुतेक अमळनेर शहरात राहणाऱ्या लोकांच्या त्या प्रतिक्रिया होत्या. 

नगराध्यक्षांनी घेतली दखल

सोशल मीडियावरील या घडामोडीची दखल नगराध्यक्ष भारती नरेंद्र चौधरी यांनी घेतली, यानंतर नगराध्यक्षांनी संदीपकुमार सांळुखे यांच्या स्टेटस खाली आपली प्रतिक्रिया दिली, यात त्यांनी म्हटलंय,  ज्या भागात साळुंखे राहतात, त्या भागात जुनी पाईपलाईन आहे. या पाईपमध्ये झाडाच्या मुळ्या अडकल्याने पाणीपुरवठा होण्यास अ़डचण आहे. नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी देखिल व्यक्त केली आहे, तसेच या भागातील काम आपण युद्धपातळीवर हाती घेणार असल्याचं नगराध्यक्षांनी म्हटलंय.

नगराध्यक्षांनी सोशल नेटवर्किंग साईटवरून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची तात्काळ दखल घेतल्याने, सोशल नेटवर्किंगवर नगराध्यक्ष भारती चौधरी यांचं कौतुक केलं जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.