'फेसबुक' तुमच्यापेक्षा जास्त स्मार्ट!

केम्ब्रिज युनिव्हर्सिटी तसंच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनकर्त्यांनी एक उपकरण विकसित केलंय. या उपकरणाद्वारे, तुम्ही फेसबुकवर 'लाईक' केलेल्या स्टेटसचं विश्लेषण करून तुमच्या व्यक्तीमत्त्वाला तुमच्या मित्रांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं तुमच्यासमोर सादर करेल. 

Updated: Jan 14, 2015, 08:02 AM IST
'फेसबुक' तुमच्यापेक्षा जास्त स्मार्ट! title=

लंडन : केम्ब्रिज युनिव्हर्सिटी तसंच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनकर्त्यांनी एक उपकरण विकसित केलंय. या उपकरणाद्वारे, तुम्ही फेसबुकवर 'लाईक' केलेल्या स्टेटसचं विश्लेषण करून तुमच्या व्यक्तीमत्त्वाला तुमच्या मित्रांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं तुमच्यासमोर सादर करेल. 

संशोधनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवविकसित उपकरण सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकवर कोणत्याही व्यक्तीनं 'लाईक' केलेल्या गोष्टींचं विश्लेषण करून त्याच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल त्याच्या मित्रांपेक्षा आणि नातेवाईकांपेक्षा अधिक आकलन करून सादर करू शकेल.

केम्ब्रिज सायकोमॅट्रिक केंद्राच्या के वू यूयू यांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात कम्प्युटरद्वारे आपल्या मनोवैज्ञानिक लक्षणांचा अनुमान लावून त्यानुसार प्रतिक्रिया देण्यासाठी सक्षम होऊ शकेल. त्याद्वारे अधिकाधिक माहिती देणाऱ्या आणि सामाजिक कुशलतेनं गोष्टी हाताळणाऱ्या मशीन्स निर्माण केल्या जाऊ शकतील. 

शोधकर्त्यांनी आपल्या संशोधनासाठी फेसबुकवर ८६,२२० स्वयंसेवी सहभागींच्या नमुन्याचा वापर केला. सहभागींना 'माय अॅप'च्या माध्यमातून १०० व्यक्तित्वसंबंधी प्रश्न विचारण्यात आले. 
 
यावेळी, त्यांनी विकसित केलेल्या कम्प्युटर मॉडलद्वारे व्यक्तीच्या १० 'लाईक्स'चं विश्लेषण त्याच्या सहकाऱ्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतं. तर ७० 'लाईक्स'चं विश्लेषण करून त्या व्यक्तीच्या  जवळच्या मित्रांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं तांत्रिक पद्धतीनं विश्लेषण करता येऊ शकतं. इतकंच नव्हे, तर १५०-३०० पेक्षा ज्सात 'लाईक्स'चं विश्लेषण करताना या पद्धतीनं तुमच्या जीवनसाथीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं तुमचं आकलन होऊ शकतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.